महापालिका आयुक्त फरार
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी आणि त्यांचे स्वयंसहाय्य देशपांडे यांनी एका बांधकाम व्यवसायाकडे 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने औरंगाबाद येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रुचला होता. मात्र, याची कुणकुण लागल्यानंतर आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्यासह स्वयंसहाय्यक दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी एसीबीने अहमदनगर महानगरपालिकेतील आयुक्तांचे दालन सील केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
advertisement
वाचा - छत्रपती संभाजीनगरात 'स्पेशल 26'; CID बनून गेले आणि 12 लाख लुटले
नगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे कार्यालय पोलिसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर पालिका लिपिक शेखर देशपांडे याच्याकडून ही 8 लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांचे दालन पोलिसांनी अचानकपणे ताब्यात घेतले आहे. एसीबीने कारवाई केल्याची चर्चा नगर शहरांत सुरू आहे. आता फरार झालेल्या डॉ पंकज जावळे यांच्यावर काय कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
