दुकानाच्या वरच मयूर रासणे हे त्यांच्या पत्नी व मुलासह राहतात. सोमवारी मध्यरात्री या दुकानाला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की वरच्या मजल्यावर झोपलेले रासने कुटुंबांतील सदस्यांचा दुर्देवी अंत झाला. आगीत फर्निचरचे दुकान पूर्णतः भस्मसात झाले. दुकानातून निघालेल्या दाट धुरामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आतच अडकले. मदतीसाठी आरडाओरड झाली तरी शेजाऱ्यांनी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. शेवटी धुराने गुदमरून सर्वांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचावपथकाने रात्री उशिरा मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते.
advertisement
कुटुंबावर काळाने घातला घाला...
मयूर रासने यांच्या कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. दुकानाच्या पुढील भागात राहणारे रासने कुटुंब धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये मयूर अरुण रासने (45), पत्नी पायल मयूर रासने (38), मुलगा अंश (10), चैतन्य (7) तसेच एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. तर आणखी एक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आगीचे कारण काय?
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून परिसरात शोककळा पसरली आहे.