नेमकं काय म्हणाले हजारे?
'कुठल्याही सरकारनं अथवा पक्षानं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल परंतु संविधान बदलण्याची गरज काय? जगात सर्वात चांगलं भारताचं संविधान आहे. ते बदलण्याचा कुणीही प्रयत्न करू नये' अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी दिली आहे.
दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांनी 88 व्या वर्षी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना देश बळकट करायचा असेल तर मतदान करायला हवं, चारित्र्यसंपन्न लोकांच्या हातामध्ये देश देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
advertisement
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरूआहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून यावेळी निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी चूरस निर्माण झाली असून, या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
