TRENDING:

विधानसभेपूर्वी शरद पवारांचा मोठा डाव; भाजपचा नेता तुतारी हाती घेणार?

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभेपूर्वी भाजपला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, हरिश दिमोटे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला होता, अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारली. आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

अहमदनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.   विवेक कोल्हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत, त्यावेळी पवार आणि कोल्हे यांच्यामध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी निश्चित केली आहे, मात्र दुसरीकडे विविक कोल्हे देखील इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विवेक कोल्हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी मतदारसंघात अनेक दिवसांपासून चर्चा  सूरू आहे.  कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का दिला आहे, आता भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
विधानसभेपूर्वी शरद पवारांचा मोठा डाव; भाजपचा नेता तुतारी हाती घेणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल