मात्र दुसरीकडे राम शिंदे यांनी लोकसभेचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके पुन्हा एकदा एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. निलेश लंके यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे नाटक आयोजित केले होते. या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार आणि खासदारकीला इच्छुक असलेले राम शिंदे यांनी हजेरी लावली
advertisement
आमदार निलेश लंके यांनी शिंदे यांना आवर्जून निमंत्रण दिले, यावेळी राम शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला राम शिंदे आणि निलेश लंके हे दोघेही इच्छुक उमेदवार आहेत. मात्र भाजपकडून सुजय विखे व राम शिंदे हे दोघेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यातच आता राम शिंदे यांची निलेश लंके यांच्याशी जवळीक वाढत आहे. ही जवळीक सुजय विखे यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की भाजपाची लोकसभेची इतर राज्यातील यादी जाहीर झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील यादी उशीर जाहीर होईल, कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतरच भाजपाकडून उमेदवारी जाहीर होईल. असं यावेळी राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
