छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामीण भागातील नाभिक समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये द्वेष निर्माण होत आहे. छगन भुजबळ हे फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि केलेल्या पाप धुण्यासाठी समाजाचा वापर करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. मात्र यावर नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. नाभिक नाभिक समाज हा त्यांच्या पाठीशी उभा असून यापुढेही त्यांच्या मागे उभा राहणार असल्याचं स्थानिक नेत्यांनी सांगितलं.
advertisement
ओबीसी मधून आरक्षण द्या नंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत एल्गार मिळावे सुरू केले आहेत. मात्र या मेळाव्यात सर्व समाजाचे नेते उपस्थित राहत आहेत. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील हे एकटेच सध्या नेतृत्व करत आहेत. दोन्ही नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक गाव पातळीवर समाजासमजात तेढ निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जातेय.
नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांच्या या वक्तव्याविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे, तसंच भुजबळांनी माफी मागावी, अन्यथा राज्यभरात निषेध करू, असा इशाराही नाभिक समाजाकडून दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला आहे. ‘राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये,’ असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं, यावर नाभिक समाजाने आक्षेप नोंदवला होता.
