संतती प्राप्ती संदर्भात आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हा खटला पुन्हा संगमनेर कोर्टात सुरू झाला आहे. मागील सुनावणी वेळी वकीलांमार्फत त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र जामीन मिळवण्यासाठी आज इंदोरीकर महाराज स्वत: न्यायालयात हजर रहाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंदोरीकर महाराज आज हजर न राहिल्यास त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यासाठी याचिकाकर्ते मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
काय आहे नेमकं प्रकरण?
अपत्य प्राप्ती संदर्भात इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. या खटल्याची सुनावणी संगमनेर न्यायालयात होणार आहे. मागील दोन सुनावणीला इंदोरीकर महाराज गैरहजर होते. त्यामुळे ते आज न्ययालयात हजर होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
