नेमकं काय म्हणाले अजित पवार
अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. '80 वर्षांच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे, इतरांना संधी कधी मिळणार? राज्य सरकारमध्ये 58 वर्षांचा कामगार झाला की तो निवृत्त होतो. भारतीय जनता पक्षात 75 वर्षांचा झाल्यानंतर बहुतेकवेळा निवृत्तीचा विचार होतो. पण यांनी फक्त रिटायर व्हायचं नावच केलं. आम्ही आता साठीच्या पुढे गेलो, आम्ही आणखी किती दिवस थांबायचं? असा खोचक टोला अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना लगावला आहे.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही कधी कोणत्या कामात कमी आहोत का? तर नाही. आम्ही विकास कामं करतो का तर करतो, आमची प्रशासनावर पकड आहे का तर आहे. आमच्या स्वतःच्या बारामती तालुक्याचा कशा पद्धतीने काय पालट केला हे तुम्हाला माहिती आहे, पिंपरी चिंचवड पंचवीस वर्षे माझ्या ताब्यामध्ये होता, माझ्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये होता त्याचा चेहरा मोहरा बदलून ठेवला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
