TRENDING:

Ahmednagar News : 'आई, बाबा मला माफ करा'; तरुणीने माफी मागितली अन् नंतर घेतली हरिश्चंद्र गडावरून 1400 फूट खोल दरीत उडी

Last Updated:

तरुणीने दोन पानी सुसाईड नोट लिहून हरिश्चंद्र गडावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, प्रतिनिधी :  अहमदनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका तरुणीनं दोन पानी सुसाइड नोट लिहून हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आवनी मावजी भानुशाली (वय 22 रा. घाटोकोपर, मुंबई) असं या मुलीचं नाव आहे. या मुलीनं सुसाईड नोटमध्ये आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. मात्र तीने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
advertisement

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं?  

आवनीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली आहे, या सुसाईड नोटमध्ये तीने आपल्या आई-वडिलांची माफी मागीतली. त्यानंतर तीने  हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. 'आई, बाबा मला माफ करा, मला कोणीही मदत करू शकलं नाही. मी खूप विचार करून हा निर्णय घेत आहे. त्याबद्दल मला माफ करा. मला खूप काही सांगायचं होतं पण ते मी सांगू शकत नाही. मला शब्दात व्यक्त करता येत नाही. मी प्रार्थना करते असं पाऊल कुणीच उचलू नका' असं भावनिक पत्र तिनं आपल्या आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलं, त्यानंतर तिने आत्महत्या केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आवनीने सुसाईड नोट लिहिल्यानंतर स्वत:ला 1400 फूट खोल दरीत झोकून दिलं. ती कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून वाटाड्यालासोबत घेत दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोकणकड्यावर पोहोचली होती. त्यानंतर तीने आपली बॅग तिथेच ठेवून कड्याच्या उजव्या बाजूनं खाली उडी मारली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाटाड्यानं याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गिऱ्ह्यारोहकांच्या मदतीनं आवनीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : 'आई, बाबा मला माफ करा'; तरुणीने माफी मागितली अन् नंतर घेतली हरिश्चंद्र गडावरून 1400 फूट खोल दरीत उडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल