TRENDING:

Ahmednagar : नाव एकाचं फोटो दुसऱ्याचा! चक्क सरन्यायाधीशांचं बनावट आधारकार्ड केलं तयार

Last Updated:

नाव आणि पत्ता दुसऱ्याचा मात्र फोटो स्वतःचा अशाप्रकारे सेतूचालक बनावट आधारकार्ड बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिष दिमोठे, शिर्डी : लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरावा आहे. मात्र हेच आधारकार्ड पैसे देऊन बनावट तयार केलं जात असल्याचं आता समोर आलं आहे. पैसे देऊन कोणाच्याही नावाचे आणि कुणाचाही फोटो असलेलं आधारकार्ड एकाने तयार केलं. केवळ प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने थेट देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याच नावानं स्वत:चं आधारकार्ड तयार करून घेतलं.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नाव आणि पत्ता दुसऱ्याचा मात्र फोटो स्वतःचा अशाप्रकारे सेतूचालक बनावट आधारकार्ड बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी स्वतःचा फोटो असलेलं आधार कार्ड तयार करून घेतलंय. पण यावर नाव मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे असून पत्ताही सरन्यायाधीशांचाच आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

केवळ प्रशासनाच्या हि गोष्ट लक्षात यावी यासाठी त्यांनी हे आधारकार्ड बनवले आहे. लोकसभेला आधारकार्ड दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे. त्यामुळे कुणाच्याही नावे अशाप्रकारे कार्ड बनवून मतदान केलं जावू शकतं. प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि निवडणूक आयोगाने मतदानकेंद्रात आधारकार्ड खरे कि खोटे हे तपासण्याची यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी सुनील मुथ्था यांनी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar : नाव एकाचं फोटो दुसऱ्याचा! चक्क सरन्यायाधीशांचं बनावट आधारकार्ड केलं तयार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल