घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच जनावरांच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर चार जणांनी हल्ला केला. ही घटना श्रीगोंदा परिसरात घडली आहे. आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांच्या अंगावर चारचाकी वाहन घालण्याचा देखील प्रयत्न झाला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
तीन जणांना अटक
या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपी नदीम कुरेशी ओंकार सायकर आणि सदन कुरेशी यांना अटक केली आहे. तर अतिक करेशी हा फरार झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Aug 28, 2023 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
गोवंशीय जनावरांच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर अहमदनगरमध्ये जीवघेणा हल्ला, वाहनाचीही तोडफोड
