मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार?
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आणि आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्याची गरज असून मराठा - ओबीसी मोर्चामुळे गावागावातील परिस्थिती भयानक झाली आहे. ओबीसी आरक्षणाची योग्य वाटणी केली तर 24 डिसेंबरच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिर्डीत व्यक्त केला.
advertisement
मराठा आणि ओबीसी नेत्यात भारत पाकिस्तान आमने सामने आल्यासारखी टीका सुरू आहे. भावा भावा प्रमाणे राहणारे लोक असे वागले तर कसे होईल? आगामी काळात जाळपोळ, दंगल काहीही होऊ शकते. बीडमध्ये झाले ते योग्य नव्हते. उद्या तुम्हा आम्हासोबत असे होऊ शकते असंही हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. हिंगोली येथे ओबीसी समाजाची सभा होणार आहे. यासाठी एकीकडे सभेचे निमंत्रण दिलं जातेय तर दुसरीकडे जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली जात आहे. विचार मांडणे ही आमची चूक आहे का? आणि मला शिव्या दिल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल हरीभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांना केला.
वाचा - भुजबळांची सभा उधळून लावूच्या इशाऱ्यानंतर आयोजकांचे प्रतिआव्हान; ओबीसी मेळाव्याआघीच वातावरण गरम
जरांगे पाटील यांचा सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यसरकारची सुटका नाही. ज्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज 29 लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोपोली येथे व्यक्त केला. सरकारने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिले तर २५ डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, पण त्याआघी 1 डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषणाची तयारी करा असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.