TRENDING:

'तुम्ही आमच्या बहिणी, पण असं कात्रीत पकडणं म्हणजे..'; अजितदादा अंगणवाडी सेविकांना नेमकं काय म्हणाले?

Last Updated:

उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीगोंदा दौऱ्यावर आले असता अंगणवाडी सेविकांनी त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. याचा मोठा फटका हा लहान बालकांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे  श्रीगोंदा दौऱ्यावर आले असता अंगणवाडी सेविकांनी त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
News18
News18
advertisement

अंगणवाडी सेविकांनी अजित पवार यांना निवेदन दिलं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली, यावर बोलताना अजित पवार म्हणाले राज्यातील अनेक निवेदनं मला भेटली आहेत. पैसे वाढले पाहिजेत यात दुमत नाही, परंतु तुम्ही आम्हाला असं कात्रीत पकडू नका, पैसे द्या नाहीतर आम्ही येणार नाही हे बरोबर नाही शेवटी तुम्हीही आमच्याच घरच्या बहिणी आहात. काही पेमेंट वाटले आहे, उर्वरीत पेमेंट लवकरच अदा केले जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांना दिलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत. याचा मोठा फटका हा ग्रामीण भागातील माता आणि बालकांना बसत असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांनी देखील आता त्यांना संप मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'तुम्ही आमच्या बहिणी, पण असं कात्रीत पकडणं म्हणजे..'; अजितदादा अंगणवाडी सेविकांना नेमकं काय म्हणाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल