कर्जत-जामखेडची एमआयडीसी आमदार रोहित पवार यांनी मविआ सरकारच्या काळात पाटेगाव-खंडाळा भागात मंजुरी मिळवली. मात्र, केवळ राजकीय श्रेय मिळू नये म्हणून फाईलवर सही झाली नसल्याचे अनेकदा आमदार पवार यांनी निदर्शनास आणले. यासाठी विधिमंडळात उपोषण करीत मंत्री उदय सामंत यांचे देखील लक्ष वेधले होते. मात्र, खंडाळा-पाटेगावचा प्रस्ताव रद्द झाला. त्यांनतर आमदार राम शिंदेंनी सदरच्या एमआयडीसीसाठी सत्ताधारी आमदार म्हणून प्रयत्न सुरू केले.
advertisement
वाचा - ज्योती मेटेंनी पहिल्यांदाच जाहीर केली भूमिका, बीड लोकसभा लढवण्याबाबत म्हणाल्या..
राजकीय वजन वापरत ती फाईल पुन्हा नव्याने पुढे आणत नागरिक सुचवतील ती जागा आणि औद्योगिक विकास मंडळाच्या निकषात बसणारी जागाच संपादन करण्याची भूमिका त्यांनी घेत कर्जत तालुक्यतील कोंभळी, थेरगाव आणि रवळगाव परिसरातील जवळपास 480 हेक्टर क्षेत्रास रविवारी तत्त्वता मंजुरी मिळवली. वास्तविक पाहता कोंभळी परिसरात होणारी एमआयडीसीचा फायदा कर्जत शहराच्या व्यापारी पेठेस होणार नाही. ही भावना कर्जतच्या व्यापारी बांधवांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत ती शहराजवळच असावी, अशी मागणी पुढे केली.
मात्र रविवारी कर्जतची एमआयडीसी कोंभळी भागातच होईल याची तत्त्वत: मान्यता मिळाल्याने त्यास कर्जतच्या व्यापारी असोसिएशनने कडाडून विरोध दर्शविला आणि मंगळवारी कर्जत बंदची हाक दिली. मात्र, त्यात देखील ख्वाडा पडला. कर्जत व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी हम करे सो कायदा म्हणून कारभार करीत असून बाकी व्यापाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने मंगळवारी बंदला विरोध केला आणि आपली दुकाने सुरू ठेवली, त्यामुळे कर्जत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
