मोहन यांनी खासगी बँकेतून कर्ज घेऊन माल वाहू टेम्पो घेतला होता. मात्र, दोन आठवडे कर्ज थकीत असल्याने संबंधित बँकेने आपला टेम्पो जमा केला आणि परस्पर विकला. कोणतीही सूचना न देता बॅंकेने टेम्पो विकल्यानं आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्यानं मोहन यांनी 10 डिसेंबर 2023 ला विष प्राशन करून आत्महत्या केली.
advertisement
पोलिसांना मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली होती. हे चिठ्ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने होती. माझे दोन हफ्ते थकल्यानं संबंधित बॅंकेने माजा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता परस्पर विकाला. वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील, असं चिठ्ठीत लिहिलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच वसंत मोरेंनी रक्ताटे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. खासगी बँकेच्या जाचाल कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मोरे यांनी केली. जर गुन्हे दाखल झाले नाही तर मनसे स्टाईल हिसका दाखवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
