अजित पवारांनी घेतलेल्या वेगळ्या भुमिकेचे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर महायुतीत सहभागी असलेल्या इतर आणि विशेषतः भाजप पक्षातही पडसाद पडणार काय याची चुणूक सध्या नगर जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. कारण कधी भाजपच्या आमदार राम शिंदेंच्या गाडीचे सारथ्य राष्ट्रवादी अजितदादाच्या गटाचे आमदार निलेश लंके करताहेत तर, लंकेंच्या होम ग्राउंडवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे लंकेंच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या विजय औटींच्या गाडीचे सारथ्य करताहेत.
advertisement
एकमेकांचे पक्ष वेगवेगळे असले तरी योगायोगाने हा ड्राइव्हिंग योग साधत हा एकमेकांचा एकोपा वरवर मैत्रीपूर्ण दिसत असला तरी यातुन काय राजकीय संदेश द्यायचाय तो बरोबर दिला जातोय आणि नागरिकांच्याही तो लक्षात येतोय असाच आहे. कर्जत-जामखेड मध्ये आमदार रोहित पवारांनी 2019 मध्ये विजय मिळवत राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर पवार-शिंदे यांचे राजकीय द्वंद्व सुरू झाले. यातूनच रोहित पवारांनी औटींच्या कारचे सारथ्य केल्यानंतर ते नेहमीच इतरांची कॉपी करतात असा खोचक टोमणा मारला आहे.
वाचा - 'ज्यांना कुणबी, शेतकरी शब्दाची ऍलर्जी आहे त्यांनी...', जरांगेंचा थेट हल्ला
नवरात्रात मोहटादेवी दर्शनाला जाताना आमदार राम शिंदेंनी महिलांसाठी मोहटादेवी दर्शन उपक्रम राबवणाऱ्या आमदार निलेश लंकेंची बेस कॅम्पवर भेट घेतली. इथे राम शिंदेच्या कारचे सारथ्य आमदार लंके यांनी करत मोहटादेवी गडावर जात एकत्र देवीची पूजा आणि आरती केली. कुठेतरी आमदार लंकेंनी "महायुती" धर्म पाळला असला तरी यातून आमदार रोहित पवार सावध झाले असून त्यांनीही आमदार निलेश लंकेंच्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवाराचे स्टेअरिंग हातात घेतल्याचे दिसत आहे.
