2019 च्या निवडणुकांमध्ये मंत्री असतानाही रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये सुरू झाला, त्यातच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार हे शरद पवार गटात गेले तर पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे शह देण्यासाठी निलेश लंके यांनी राम शिंदे यांनी साथ दिली आहे का? तर दुसरीकडे निलेश लंके आणि विखे यांच्यात नेहमी संघर्ष होत असतो. त्यामुळे एका पक्षात असून सुद्धा राम शिंदे यांनी विखेंबाबत उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे राम शिंदे यांनी निलेश लंके यांना साथ दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे.
advertisement
जिल्ह्याचे राजकारणामध्ये विखे, लंके, शिंदे, विखे आणि पवार विरुद्ध शिंदे असा संघर्ष होत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाकडून रोहित पवार यांचे नाव पुढे आले आहे तर अजित पवार गटाकडून निलेश लंके यांना साद घातली आहे. त्यातच राम शिंदे यांनीही पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
वाचा - 'कंत्राटी'वरून राजकारणाला 'भरती', 'त्या नेत्यांचा राजीनामा घ्या', सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी
यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले महाराष्ट्रात युतीचे सरकार आलं आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये युतीचा धर्म काटेकोरपणे पाळला जात आहे. त्यामुळे त्यात काही वावगे नाही. उलट येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या मतांनी भाजपाचा खासदार निवडून येईल यात कुठलीही शंका नाही.
