घटेनेबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशा राज्यातून परिवारासह साईदर्शनासाठी आलेले 72 वर्षीय बैरागी राऊत यांची कुटूंबापासून ताटातूट झाली होती. शोधाशोध करूनही वडिलांचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर मुलाने पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. दरम्यान स्थानिक पत्रकार प्रशांत अग्रवाल आणि रिक्षाचालक अख्तर पठाण यांच्या मदतीमुळे अजित बैरागी यांची आठ दिवसानंतर आपल्या बेपत्ता वडीलांशी भेट झाली.
advertisement
शिर्डीपासून जवळच असलेल्या पुणतांबा गावात रिक्षा चालकाला एक बेपत्ता व्यक्ती फिरताना आढळून आली. रिक्षाचालक अख्तर पठाण यांनी या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषेचा अडसर होता. त्यामुळे अख्तर पठाण यांनी या व्यक्तीला घेऊन थेट शिर्डी गाठली. अख्तर पठाण आणि पत्रकार प्रशांत अग्रवाल यांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे तब्बल आठ दिवसांनतर बाप, लेकाची भेट झाली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले.
