अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति कीलो एकवीस रुपये भाव मिळाला आहे. तर प्रति क्विंटल 2100 रुपये एवढा भाव मिळाला आहे, उपबाजार समितीमध्ये 53219 एवढ्या गोण्याची आवक झाली. कांद्याला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 2100 भाव मिळाला असता तरी यातून थोडाफार खर्च तरी मिळतो. त्यामुळे सरकारने निर्यातबंदी करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
दरम्यान निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणीचं बजेट मात्र कोलमडू शकतं. सध्या काद्याला 21 रुपये किलो एवढा भाव मिळत आहे. भविष्यात कांद्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 26, 2024 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
onion price : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कांद्याचे भाव वाढले; गृहिणींचं बजेट कोलमडणार?
