विखे पाटील म्हणाे की, आप्पासाहेब पवार आणि विखे कुटुंबाचे जवळचे संबंध होते. आप्पासाहेब हे स्वाभिमानी जगणारे होते त्यामुळे त्याचा राजकारणावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब सक्रिय राजकारणात होते. त्यामुळे कदाचित त्यांचा रोहित पवार यांना इशारा असेल की जास्त धावपळ करू नको नाहीतर अजित पवार होऊन, तुझी ही फसगत होईल असं त्यांना सुचवायचं असेल.
advertisement
व्हायरल झालेल्या एका पत्रात असा दावा केला गेला होता की, ‘तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या.' या पत्रानंतर राजेंद्र पवार यांनी शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर तेव्हाच फूट पडली असती असं म्हणत दुजोराच दिला आहे.
नेमकं काय म्हणाले राजेंद्र पवार?
जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तुम्हाला आज जे चित्र दिसत आहे, कदाचित त्यावेळीच दिसलं असतं. पण शरद पवारांनी त्यावेळी मला कारखान्याची निवडणूक लढण्यापासून थांबवलं, त्यानंतर मी माझं संपूर्ण लक्ष व्यवसाय स्थिर करण्यात आली सामाजिक कर्याकडे केंद्रीत केलं, आणि आजित पवार यांची राजकारणात एण्ट्री झाली, अशी प्रतिक्रिया या पत्रावर राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
