TRENDING:

LokSabha Elections : ...त्यानंतरच महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल, भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Last Updated:

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर,साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : सर्वच राजकीय पक्षांना आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. तयारीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वीच भाजपनं शनिवारी लोकसभेसाठी आपल्या 195 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये. त्यामुळे भाजपकडून लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवार कधी जाहीर होणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
News18
News18
advertisement

या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'लोकसभेसाठी भाजपानं इतर राज्यातील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपानं निवडणुकीसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, कारण महाविकास आघाडीचे जागा वटाप झाल्यानंतरच भाजप आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल' असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

advertisement

दरम्यान यावेळी स्वत: राम शिंदे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, ते अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी पुन्हा सुजय विखे यांना तिकीट मिळणार की? राम शिंदे यांची लॉटरी लागणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि राम शिंदे यांची सध्या जवळीक वाढताना दिसत आहे. निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राम शिंदे यांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं. राम शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुजा देखील करण्यात आली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, राज्यातील दोन प्रमुख पक्षांत फूट पडली आहे. एक म्हणजे शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी. दोन्ही पक्षाचे दोन -दोन गट निर्माण झाल्यामुळे यंदाची लोकसभा आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
LokSabha Elections : ...त्यानंतरच महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल, भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल