भुजबळ यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या राज्यात सुरू आहे, मात्र ओबीसीमध्ये आता जागृती झाली आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु गावागावात ओबीसी जागृत झाला आहे. त्यामुळे धमकवण्याचा प्रयत्न करू नये, राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा महाराष्ट्रातील ओबीसी सर्व ताकतीने याचा विरोध करेल. आम्ही सर्व ओबीसी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा देणार आहेत. असा इशारा यावेळी आमदार गोपीचंद पडळक यांनी दिला आहे.
advertisement
भुजबळांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा खुलासा
दरम्यान भुजबळ यांच्या राजीनाम्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गडचिरोलीमध्ये आले असता फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिक विस्तारानं सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्विकारलेला नाही, असा खुलासा फडणवीस यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर केला आहे.
