TRENDING:

Ahmednagar : दोन वर्षात चौघांचं कुटुंब संपलं; पती-पत्नीने एकत्रच संपवलं आयुष्य, मुलाने 8 दिवसांपूर्वी घेतलेला गळफास

Last Updated:

पुण्यात मुलाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर ८ दिवसांनी त्याच्या आई-वडिलांनी संगमनेरमध्ये गळफास घेऊन जीवन संपल्याची धक्कादायक घटना घडलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

अहमदनगर : संगमनेरमध्ये पती-पत्नीने गळफास घेऊन एकत्रच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. आठवड्याभरापूर्वी त्यांच्या 21 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केलीय. तर दोन वर्षांपूर्वी 16 वर्षांच्या मुलानेही असंच आयुष्य संपवलं. एक कुटुंब अवघ्या दोन वर्षात गळफास घेऊनच संपल्याने खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकाजवळील असणाऱ्या वाडेकर गल्लीत ही घटना घडलीय. गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.

advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलाने घरात तर आठ दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या 21 वर्षीय मुलाने देखील गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर यांनी देखील आयुष्य संपवलं. घटनास्थळी पोलिसांना दोन चिठ्ठ्यासुद्धा आढळून आल्या आहेत.

Pune Crime News : पुण्यात खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या; दोघांना घेतलं ताब्यात

advertisement

गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांचा 21 वर्षीय मुलगा श्रीराज गणेश वाडेकर पुण्यामध्ये शिकत होता तेथे गळफास घेत त्याने आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या 16 वर्षीय मुलाने देखील राहत्या घरात आत्महत्या केली होती. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केलाय. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान या दोन्ही पती-पत्नीच्या जवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यांच्या मुलाचा पुणे येथे जो मृत्यू झाला होता त्यात वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काही मजकूर असल्याची चर्चा होत आहे. गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेत कार्यरत होते ते सध्या सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar : दोन वर्षात चौघांचं कुटुंब संपलं; पती-पत्नीने एकत्रच संपवलं आयुष्य, मुलाने 8 दिवसांपूर्वी घेतलेला गळफास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल