TRENDING:

Setu office : कॉलेज प्रवेशासाठी दाखल्यांची कटकट संपणार? महसूलमंत्री विखे पाटलांनी घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Setu office : विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्याची कटकट आता कायमची संपणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, 20 सप्टेंबर (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची धावपळ उडते ती प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी. सरकारी कार्यालयात एकाच वेळी लोटणारी गर्दी, तिथला लालफितीचा कारभार, दलालांचा विळखा अशा अनेक कारणांमुळे दाखले मिळविताना विद्यार्थी आणि पालकांच्या नाकी नऊ येतात. हे हाल संपविण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे प्रत्येक कॉलेजमध्येच सेतू कार्यालय सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विखे पाटील केली आहे. यामुळे विविध प्रकारचे दाखले आता कॉलेमध्येच मिळणं शक्य होणार आहे.
कॉलेज प्रवेशासाठी दाखल्यांची कटकट संपणार?
कॉलेज प्रवेशासाठी दाखल्यांची कटकट संपणार?
advertisement

दाखल्यांची कटकट जाणार?

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज संगमनेर कॉलेजमध्ये "युवा ही दूवा" हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यात पहिल्यांदाच युवा ही दूवा हा कार्यक्रम राबवला गेला. महसूलच्या विविध योजना आणी दाखले कसे मिळवायचे याबाबतची माहीती कॉलेज तरुणांनी गावोगावी आणि विद्यालयात जावून दिली. कॉलेज युवक युवतींना विविध दाखले लागत असतात. यासाठी कॉलेजमध्येच सेतू सुविधा केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर दिव्यांग बांधव आणी एकल महिलांना सेतू केंद्र देण्यास प्राधान्य देणार असल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

advertisement

वाचा -  प्रत्येक घरात बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ नसतात, सुप्रिया सुळेंचं लोकसभेत स्पष्टच बोलल्या

प्रवेशासाठी विविध दाखले महत्त्वाचे

अकरावी, इंजिनीअरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनुसूचित जाती, जमातीसाठी तसेच इतर मागासवर्गीयांसाठी काही जागा राखीव असतात. कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी, अपंग विद्यार्थ्यांसाठी व अन्य काही आरक्षित घटकांसाठी काही जागा राखीव असतात. तसेच फीमाफीच्या सवलतीही उपलब्ध असतात. या फी सवलतींचा व राखीव जागांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे संबंधित सरकारी कार्यालयातून प्राप्त करावी लागतात. त्याशिवाय याचा लाभ घेता येत नाही. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, ही कटकट आता कायमची संपणार असल्याचे दिसत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Setu office : कॉलेज प्रवेशासाठी दाखल्यांची कटकट संपणार? महसूलमंत्री विखे पाटलांनी घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल