Supriya Sule : प्रत्येक घरात बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ नसतात, सुप्रिया सुळेंचं लोकसभेत स्पष्टच बोलल्या
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Supriya Sule In Loksabha : लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना अमित शहा यांनी भावावरून केलेल्या वक्तव्याचा दाखला देताना प्रत्येक घरात असे भाऊ नसतात असं म्हटलंय.
दिल्ली, 20 सप्टेंबर : लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना अमित शहा यांनी भावावरून केलेल्या वक्तव्याचा दाखला देताना प्रत्येक घरात असे भाऊ नसतात असं म्हटलंय. लोकसभेत सोनिया गांधी यांच्या भाषणानंतर लगेच भाजप खासदार निशिकांत दुबे बोलण्यासाठी उभा राहिले. तेव्हा काँग्रेसकडून गोंधळ घालत सत्ताधारी पक्षाने पहिली संधी महिला खासदाराला द्यायला हवी होती असं म्हटलं.
विरोधकांनी गोंधळा घातला तेव्हा अमित शहा अचानक उभा राहिले आणि म्हणाले की, मी अधीर रंजन यांना विचारतो की महिलांची काळजी फक्त महिलाच करणार का? पुरुष करू शकत नाहीत का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा समाज हवा आहे? महिला महिलांची काळजी, महिलांचे हित हे महिलांच्या पुढे जाऊन भावांनी पाहिलं पाहिजे. ही देशाची परंपरा आहे.
advertisement
अमित शहा यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत सुप्रिया सुळे यांनी मनातली खंंत व्यक्त केल्याची चर्चा आता सुरू झालीय. सुप्रिया सुळे संसदेत बोलायला उभा राहिताच त्यांनी महिला विधेयकाचे स्वागत केलं. महिला विधेयक चांगले आणि महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान, महिला आरक्षणावर आज चर्चा सुरू आहे पण मी इतर काही मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छिते. सध्या कॅनडाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या समाजांच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे विषय आहेत. त्यावर चर्चा झाल्यास आम्ही सरकारची साथ देऊ.
advertisement
अमित शहा यांनी एक विधान केलं इथं की भाऊ का करू शकत नाही, भाऊसुद्धा करू शकतो. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीच्या कल्याणाचा विचार करतात. प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि अजित पवार हे भाजपसोबत गेल्याच्या घटनेशी जोडला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2023 2:32 PM IST
मराठी बातम्या/देश/
Supriya Sule : प्रत्येक घरात बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ नसतात, सुप्रिया सुळेंचं लोकसभेत स्पष्टच बोलल्या