26 कोटी 32 लाखाची मागणी असलेला राम गणेश गडकरी साखर कारखाना केवळ 12 कोटी 95 लाख या नाममात्र दरात विकल्याचा आरोप आहे. प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यासह प्रसाद शुगर अलाईड अग्रो प्रॉडस्टस लीआणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा. ली. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 12 जानेवारी 2024 ला याची सुनावणी होणार आहे. पदाचा दुरुपयोग करून प्रभावाचा वापर करून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप यात ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेनं MRA मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर ईडीने ECIR दाखल केला आहे.
advertisement
वाचा - 'धारावीत मोर्चा काढल्यानंतर समजलं चमचे कोण..' उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला
काय आहे प्रकरण?
26 कोटी 32 लाख रुपयांचे मूल्यांकन असणाऱ्या या कारखान्याची केवळ 12 कोटी 95 लाखांत विक्री झाली. अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद शुगर ही कंपनी प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची आहे. प्रसाद तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक. पुढे व्यवहार पूर्ण झाला. खरे तर कारखान्याला योग्य किंमत येत नाही म्हटल्यावर पुन्हा निविदाही काढता आल्या असत्या; पण तसे झाले नाही. उलट मंजूर निविदेच्या 25 टक्के रक्कम भरण्यासाठी सात दिवस व उर्वरित रक्कम भरण्यासाठी 45 दिवस अशी अट असतानाही ही रक्कम भरण्यास खरेदीदार कंपनीने तब्बल तीन वर्षे लावल्याचा आरोप केला जातो.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावरही देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. ते नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत.
