TRENDING:

अहमदनगर हादरले! पुन्हा गोळीबाराची घटना,.... म्हणून ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या

Last Updated:

जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साहेबराव कोकणे, अहमदनगर : दोन आठवड्यापूर्वी पारनेरमध्ये गोळीबारााची घटना घडली होती. त्यानंतर आता अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस घेत आहेत. या प्रकरणी बाबुलाल पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

बाबुलाल पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

पोलिसात दिलेल्या तक्रारीबाबत मनात राग धरून ३ मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगर हादरले! पुन्हा गोळीबाराची घटना,.... म्हणून ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल