ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सिमेवर असलेल्या शनिदेवगाव येथे घडली आहे. गोदावरी नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जात असताना ही दुर्घटना घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी सरळ नदीपात्रात गेल्यानं तिघे जण वाहून गेले. यातील महिलेचा मृतदेह सापडला आहे. तर इतर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.
advertisement
दुचाकी पाण्यात कोसळल्यानंतर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काहीही करता आलं नाही, त्यामुळे सर्वजण पाण्यात वाहून गेले. पोलीस आणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, कालपासून दोघांचा शोध सुरू आहे.
Location :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Oct 13, 2024 1:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
चालकाचं नियंत्रण सुटून भीषण अपघात, दुचाकी गोदावरीत कोसळली, तीन जण गेले वाहून
