घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात गुरुवारी पहाटे नईम पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून पाच जणांनी त्यांची हत्या केल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केल्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांनाही चांगलचा धक्का बसला. नईम पठाण यांची हत्या दरोडेखोरांनी नाही तर त्यांच्याच पत्नीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
advertisement
...म्हणून केली हत्या
बुशरा पठाण असं या घटनेतील आरोपी महिलेचं नाव आहे. तीने पतीला आधी झोपेच्या गोळ्या खावू घातल्या, त्यानंतर तीने पतीचा साडीने गळा आवळत हत्या केली. हत्येचं प्रकरण दडपण्यासाठी तीने दरोड्याचा बनाव केला, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी पत्नीला अटक केली आहे. सातत्याने होणाऱ्या शारीरिक अत्याचाराला कंटाळून बुरशा पठाण हिने आपल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
