अहमदनगर, 24 ऑगस्ट : शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी मोठी चढाओढ सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळतेय. वाकचौरेंचा ठाकरे गटात झालेला प्रवेश, रामदास आठवले यांची शिर्डीच्या जागेची मागणी आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा मतदारसंघाचा सुरू असलेला दौरा. यामुळे शिर्डीची जागा चर्चेचा विषय झाली आहे.
2009 साली रामदास आठवले यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा लढवली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता मात्र पुन्हा त्यांनी शिर्डीची जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आठवलेंना हिरवा झेंडा दाखवला आहे.
advertisement
आमची तीन चार पक्षांची युती असून पक्षाला वाटले जर त्यांना उमेदवारी द्यावी तर त्यांना कोण अडवणार आहे. मला पक्ष सांगेल ते मी करेल आणि रामदास आठवले यांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करू असं शिर्डीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हणलं आहे.
रामदास आठवले यांचा 2009 साली पराभव करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाचा असून आम्हाला त्याची चिंता नाही असं खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटलं आहे.
वाचा - 'आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल आम्ही उठलो तर...' बच्चू कडू यांचं मोठं विधान
शिर्डीचे माजी खा. स्वगृही परतणार
शिर्डीत रामदास आठवले यांचा पराभव करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वाकचौरे स्वगृही परतणार असले तरी गद्दार नको एकनिष्ठ द्या, अशी मागणी करत शिवसैनिक विरोध करताना दिसताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही प्रत्येक लोकसभा मंतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. अशात वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाला महत्त्व आलं आहे.