TRENDING:

दारूची नशा जीवावर बेतली; मित्रांसोबत शिर्डीला आला, हॉटेलमध्ये तरुणासोबत घडलं भयानक कांड

Last Updated:

शिर्डीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, हरिष दिमोटे, प्रतिनिधी :  शिर्डीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दारूची नशा तरुणाच्या जीवावर बेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या तरुणाचा शिर्डीमध्ये दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. बुलाढाणा जिल्ह्यातील चार मित्र साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीमध्ये आले होते. याचवेळी ही घटना घडली आहे. शुभम नारखेडे , वय 25 रा.शेंभा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा असं या मृत तरुणाचं नाव आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुभम नारखेडे , वय 25 रा.शेंभा, तालुका मोताळा हा तरुण आपल्या अन्य तीन मित्रांसह शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता. हा धक्कादायक प्रकार शिर्डीजवळच असलेल्या निमगाव कोऱ्हाळे येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे. दारूच्या नशेत ते हॉटेलच्या टेरेसवर चढले मात्र अंदाज न आल्यानं तोल जाऊन शुभम खाली पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

advertisement

दारूच्या नशेत अंदाज न आल्यानं मृत्यू 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

घटना घडली तेव्हा शुभम हा दारू पिलेला होता. दारूच्या नशेत ते हॉटेलच्या टेरेसवर गेले. मात्र दारू पिल्यानं अंदाज न आल्यामुळे त्याचा टेरेसवरून खाली पडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिर्डी पोलिसांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
दारूची नशा जीवावर बेतली; मित्रांसोबत शिर्डीला आला, हॉटेलमध्ये तरुणासोबत घडलं भयानक कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल