मालेगावात इस्लामिक पार्टीचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. इथं भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, इस्लाम पार्टी आणि AIMIM यांच्यात बहुरंगी राजकीय सामना रंगताना दिसत आहे. इथं ८४ पैकी ४६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इस्लामिक पार्टीला चांगलं यश येताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही कलांमध्ये इस्लामिक पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.
advertisement
विशेष म्हणजे इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत ‘मालेगाव सेक्युलर फ्रंट’ची स्थापना केली असून, ही आघाडी ८४ जागांवर उमेदवार उभे करत निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
दुसरीकडे, संभाजीनगरात एमआमएम पार्टी प्रस्थापितांना धक्के देताना दिसत आहे. इथं एमआयएम हा पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष ठरत आहे. इथं एमआयएमने शिवसेना शिंदे गटासह, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या दिग्गज पक्षांना धक्का दिला आहे. इथं भाजप 18, शिवसेना शिंदे गट -11, शिवसेना UBT - 7, एमआयएम - 12, काँग्रेस - 4, राष्ट्रवादी- 2, राष्ट्रवादी SP- 1 आणि इतर एक जागेवर आघाडी घेतली आहे.
