TRENDING:

एमआयएमचा बालेकिल्ला हादरला! छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 नगरसेवकांचे पद धोक्यात; प्रशासकीय कारवाईने खळबळ

Last Updated:

एमआयएमच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असा खळबळजनक आरोप एमआयएमचे नगरसेवकांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: एमआयएमचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाला मोठा राजकीय हादरा बसण्याची शक्यता आहे. शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेत अडथळा आणल्याच्या कारणावरून एमआयएमच्या 14 माजी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित 14 नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता याच गुन्ह्यांचा आधार घेत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत.

advertisement

एमआयएमच्या नगरसेवकांचा खळबळजनक आरोप

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी या कारवाईबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे एमआयएम आक्रमक झाली आहे. मनपा आयुक्त हे भाजप आणि शिवसेनेच्या तालावर नाचणारे 'कटपुतली' आहेत. जाणीवपूर्वक एमआयएमच्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले जात आहे, असा खळबळजनक आरोप एमआयएमचे नगरसेवकांनी केला आहे.

advertisement

मनपा आयुक्त विरुद्ध एमआयएम नगरसेवकांच्या वादाचा नवा अंक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरच्या या 14 माजी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले, तर त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही कारवाई झाल्यास एमआयएमसाठी हा मोठा सेटबॅक मानला जाईल. एका बाजूला प्रशासन कायद्याचा बडगा उगारत असताना, दुसरीकडे एमआयएम याला राजकीय षडयंत्र ठरवत रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. यामुळे येणाऱ्या काळात मनपा आयुक्त विरुद्ध एमआयएम असा संघर्ष अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एमआयएमचा बालेकिल्ला हादरला! छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 नगरसेवकांचे पद धोक्यात; प्रशासकीय कारवाईने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल