महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओवेसींच्या एमआयएम (AIMIM) पक्षाने अनपेक्षित कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एमआयएमने १३ महापालिकांमध्ये आपले अस्तित्व भक्कम केले असून, त्यांचे तब्बल ९५ नगरसेवक विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, अनेक शहरांत त्यांनी प्रस्थापित समाजवादी पक्षाला (SP) मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. एमआयएमने सर्वाधिक यश छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावमध्ये मिळवले आहे. मुंबईतही एमआयएमचे सहा जण निवडून आले आहेत.
advertisement
मुंबईत एमआयएमने आपली ताकद वाढवली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, मुंबई महापालिकेत एमआयएमचे ६ नगरसेवक विजयी झाले आहेत. मुस्लीम बहुल भागांत एमआयएमने मुसंडी मारल्यामुळे समाजवादी पक्षाच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे.
>> मुंबईतील एमआयएमच्या विजयी उमेदवारांची यादी
वॉर्ड क्रमांक १३४- मेहजबिन खान - एमआयएम
वॉर्ड क्रमांक १३६- जमीर कुरेशी - एमआयएम
वॉर्ड क्रमांक १३७- समीर पटेल- एमआयएम
वॉर्ड क्रमांक १३८- रोशन शेख- एमआयएम
वॉर्ड क्रमांक १३९- शबाना शेख- एमआयएम
वॉर्ड क्रमांक १४५- खैरुनिसा हुसेन- एमआयएम
