TRENDING:

मतदानाच्या दिवशीच नवी मुंबईत शिंदेंना मोठा धक्का, मध्यरात्री दोन उमेदवारांना पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Navi Mumbai Mahanagar Palika: ऐरोलीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी नगरसेवक एम. के. मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी आणि त्यांचा मुलगा करण मढवी यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली परिसरात मतदानाच्या दिवशीच मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ऐरोलीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी नगरसेवक एम. के. मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी आणि त्यांचा मुलगा करण मढवी यांच्यावर युवकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता एम. के. मढवी आणि त्यांचा मुलगा करण मढवी यांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.
News18
News18
advertisement

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या दोघांना एनआरआय पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, ऐरोली सेक्टर १६ इथे कार्यालयाबाहेर कॅरम खेळत बसलेल्या सुनील केदार यांच्यासह आणखी चार युवकांवर एम. के. मढवी, करण मढवी व विनया मढवी या शिवसेनेच्या उमेदवारांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात युवकांना मारहाण करत “कोणाच्या जीवावर उडतोस” अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे एम. के. मढवी, करण मढवी व विनया मढवी हे तिघेही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असून सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

advertisement

एम. के. मढवी – प्रभाग क्रमांक ४-ड

करण मढवी – प्रभाग क्रमांक ५

विनया मढवी – प्रभाग क्रमांक ५-ड

ऐरोली–दिघा परिसर हा निवडणुकीच्या काळात संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत तीन माजी नगरसेवकांकडून दिवसाढवळ्या मारहाणीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेअंतर्गत मारहाण करून दुखापत करणे, जमाव जमवून शांतता भंग करणे, धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणे अशा एकूण नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. शस्त्राचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास शिक्षेत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब दरात चढ-उतार, शेवगा भाव तेजीत, गुळाची काय स्थिती?
सर्व पहा

आज मतदानाचा दिवस असतानाच शिवसेनेच्या दोन उमेदवारांना अटक झाल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, विरोधकांनी या पोलिस कारवाईचे स्वागत करत ऐरोलीतील मतदान शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, आज सुट्टीचा दिवस असल्याने मढवी पिता-पुत्रांना ऐन मतदानाच्या दिवशी पोलीस ठाण्यातच दिवस काढावा लागणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानाच्या दिवशीच नवी मुंबईत शिंदेंना मोठा धक्का, मध्यरात्री दोन उमेदवारांना पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल