या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा हातमिळवणी करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतही युती करण्यासंदर्भात प्राथमिक पातळीवर बोलणी सुरू असल्याची माहिती स्थानिक नेत्यांकडून दिली जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी याबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक शरद पवार गटाला सोबत घेऊन लढण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः आपल्याशी चर्चा केल्याचे नाना काटे यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतही संवाद सुरू असल्याचे काटे यांनी स्पष्ट केले.
advertisement
मात्र, शरद पवार गटाशी किंवा शिंदे गटाशी युतीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय भवितव्य नेमके कोणत्या दिशेने जाणार, आणि या बुडत्या जहाजाला अखेर कोण हात देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजितदादा कोणता डाव टाकणार?
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अजित पवारकडे पक्षप्रवेशांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होते. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक इच्छुक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत आज भाजपाच्या माजी स्थायी समिती अध्यक्ष सीमा साबळे अश्विनी जाधव उबाठाच्या रूपाली आल्हाट यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
