हेही वाचा: अजित पवार योजना क्रॅश लाईव्ह अपडेट
अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजित पवारांसह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक, सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे.
advertisement
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लॅण्डिंगआधी भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये हा अपघात झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होत. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र, डीसीजीएनं दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
