"वेळ थांबली असती तर..."
जय पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजित पवारांसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये जय यांनी आपल्या मनातील वेदना मोकळ्या केल्या आहेत. पहिला फोटो अजित पवार आणि जय पवार यांचा आहे. ते एका तलावाच्या बाजुला निसर्गरम्य ठिकाणी हाताची घडी घालून उभे आहेत. या फोटोवर जयने 'तुमची खूप आठवण येतेय, डॅड' असं कॅप्शन लिहिलं आहे.
advertisement
तर दुसऱ्या फोटोत जयने अजित पवारांना मिठी मारल्याचा फोटो शेअर केला आहेत. यात त्यानं लिहिलं की, "डॅड, काश वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो." या शब्दांतून वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि मुलाचे वडिलांप्रति असलेले अतोनात प्रेम दिसून येत आहे.
अपघात कसा झाला?
अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी या विमानाने मुंबईहून उड्डाण केलं होतं. ८ वाजून ४३ मिनिटांनी हे विमान बारामती विमानतळावर पोहोचलं. पण विमानाचं लँडिंग करताना विमानाला तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यावेळी बारामती परिसरात दाट धुके होते आणि दृश्यमानता खूप कमी होती. विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा दोनदा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. विमानाचा स्फोट इतका जबरदस्त होता की, प्रवाशांना वाचवण्याची संधीही मिळाली नाही.
मृतांची नावे
या भीषण अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १. अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) २. कॅप्टन सुमित कपूर (पायलट) ३. कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट) ४. विदीप जाधव (अजित पवारांचे अंगरक्षक/PSO) ५. पिंकी माळी (एअर हॉस्टेस) याचा समावेश होता.
