TRENDING:

'...तू माझ्यापासून का लपवलं?' शेवटच्या क्षणी दादांची साथ सोडली, महेश लांडगेनंतर आणखी एक नेता भावुक, मुखाग्नी दिलेल्या ठिकाणीच दाटला कंठ

Last Updated:

अजित दादांच्या जाण्याचं दु:ख केवळ त्यांच्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना झाला नाही. तर त्यांच्या कट्टर विरोधकांना देखील झालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
२८ जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे. दादांच्या जाण्याचं दु:ख केवळ त्यांच्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना झाला नाही. तर त्यांच्या कट्टर विरोधकांना देखील झालं. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे हा वाद विकोपाला गेला होता. पण अजित पवारांच्या मृत्यूनंतर महेश लांडगेंनी अत्यंत भावुक होतं, दादांची माफी मागितली. आता महेश लांडगे यांच्यानंतर दादांची साथ सोडणारा आणखी एक नेता भावुक झाला आहे. हा नेता म्हणजे प्रशांत जगताप.
News18
News18
advertisement

प्रशांत जगताप हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे. दोघांनी अनेक वर्षे एकाच पक्षात काम केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली. तेव्हा अखेरच्या क्षणी जगतापांनी अजित दादांची साथ सोडली. आपण विचारांशी तडजोड करणार नाही. भाजपसोबत जाणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी शरद पवार गटासोबत राहणं पसंत केलं. पण अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येत असल्याने प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते निवडूनही आले.

advertisement

आता प्रशांत जगतापांनी बारामतीत जाऊन अजित पवारांवर अंत्यविधी केलेल्या स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी भावुक होत अजित दादांच्या आठवणी सांगितल्या आहेत. ज्यावेळी प्रशांत जगतापांना पॅरालाईज झाला होता, तेव्हा अजित पवारांनी त्यांनी मायेनं विचारपूस केली होती. शिवाय आपल्या डॉक्टरला कॉल करून योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले होती, अशी आठवण प्रशांत जगतापांनी सांगितली.

advertisement

प्रशांत जगताप नक्की काय म्हणाले?

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना प्रशांत जगताप म्हणाले, जून 2022 मध्ये माझा चेहरा पॅरालाईज झाला होता. तेव्हा जवळपास 15 दिवस मी ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली. 15 दिवस मी चेहऱ्याला मास्क आणि गॉगल लावूनच होतो. अखेर मोठ्या धैर्याने मी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ही बाब जगासमोर मांडली. सायंकाळी 7 वाजता मी हे फेसबूक लाईव्ह केलं आणि रात्री साडेअकरा वाजता मला अजितदादांचा देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून कॉल आला. "प्रशांत... हे तू चुकीचं केलंस, तू माझ्यापासून हे का लपवलं?" असं म्हणून दादांनी मला सुनावलं. त्यांच्या या रागवण्यामागील आपुलकीची आणि आपलेपणाची भावना तेव्हाही माझ्या मनाला स्पर्श करून गेली. "काळजी घे आणि उद्याच सकाळी मुंबईला ये" असा दादांनी दिलेला आदेश दिला. तो आदेश मी पाळला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी मुंबईत अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलो. तेव्हा आतमध्ये अजितदादा आणि एकनाथ खडसे यांची बैठक चालू होती. त्यामुळे मी बाहेरच बसलो, हे दादांना कळताच दादांनी मला आत बोलावून घेतले. त्यावेळी ही माझ्या चेहऱ्यावर मास्क, "प्रशांत मास्क काढ, मला बघू दे चेहरा" असं दादांनी म्हणतच मी मास्क काढला. माझा चेहरा पाहताच दादांनी अतिशय काळजीच्या स्वरात मला रागवण्यास सुरुवात केली, तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा जवळचा माणूस आहेस, स्वतःची तब्येत बरी नसताना तू मला काहीही न सांगता पक्षाचं काम करतोय, बैठका घेतोय हे काही बरोबर नाही असं दादांनी नाराजीच्या स्वरात सांगितलं. पुढच्याच मिनिटाला दादांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला, "प्रशांत माझा घरातला माणूस आहे, त्याच्यावर सर्वोत्तम औषधोपचार करा पण काहीही करून त्याला बरा करा" असं दादांनी फोनवरुन डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर तातडीने मला डॉक्टरांकडे जायला सांगून स्वतःच्या PA ना माझ्यासोबत पाठवलं. माझ्या कणखर नेत्याच्या आत दडलेला एक हळवा माणूस त्यावेळी मी अनुभवला, अशा शब्दांत प्रशांत जगतापांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...तू माझ्यापासून का लपवलं?' शेवटच्या क्षणी दादांची साथ सोडली, महेश लांडगेनंतर आणखी एक नेता भावुक, मुखाग्नी दिलेल्या ठिकाणीच दाटला कंठ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल