अजितदादांच्या मृत्यूने महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांची कुटुंबही अजून धक्क्यात आहेत. कॅप्टन सुमित कपूर यांची मुलगी सान्या कपूरने वडिलांसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सान्याने केलेल्या वडिलांच्या एका उल्लेखामुळे हा कोणता योगायोग आहे? असा प्रश्न पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा अजित पवारांना दादा म्हणून ओळखायचा आणि कॅप्टन सुमित कपूर यांची मुलगीही वडिलांना दादा म्हणायची. सान्या कपूरने तिच्या पोस्टच्या सुरूवातीला आणि शेवटी वडिलांचा उल्लेख दादा, असा केला आहे.
advertisement
सुमित कपूर यांच्या मुलीचं पत्र
मला माहित नाही, मी हे का लिहित आहे पण मी प्रार्थना करतो की तुम्ही हे वाचा दादा. हे एक वाईट स्वप्न आहे, ज्यातून मला जागं व्हायचं आहे. मी अजूनही डोक्याला हात लावत आहे, तुम्ही मला फोन कराल आणि म्हणाल, कुठे आहे माझी झाशीची राणी?
मी तुमच्यावर प्रेम करतो आणि मी नेहमीच वडिलांची परी असेन. मला फक्त हे दुःस्वप्न संपवायचे आहे आणि फोन करून तुमच्यासोबत बोलायचे आहे. तुमचा जन्म आकाशावर राज्य करण्यासाठी झाला आणि तुम्ही शेवटचा श्वासही तुम्हाला जे आवडतं ते करण्यात घेतलात.
सर्वोत्तम पिता, महान पायलट आणि सगळ्यात गोड माणूस
कॅप्टन सुमित कपूर तुम्ही खूप लवकर गेलात.
आय लव्ह यू दादा
मी नेहमीच तुमची राहिन
तुमची
झाशी की रानी
