TRENDING:

जय आणि पार्थला वाटतोय घात? वडिलांच्या मृत्यूची चौकशी, थेट पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Last Updated:

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि संपूर्ण कुटुंब या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत. अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, आता या अपघाताबाबत एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर येत आहे. रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाप्रमाणेच, आता खुद्द अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि संपूर्ण कुटुंब या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
News18
News18
advertisement

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुरुवातीला तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदल हे अपघाताचे कारण सांगितले जात होते. मात्र, ज्या पद्धतीने हे विमान कोसळले आणि त्यापूर्वीच्या काही घडामोडी पाहता, हा पूर्वनियोजित कट तर नव्हता ना? अशी शंका पवार कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.

advertisement

'व्हीएसआर' एअरवेजची सर्व विमाने तातडीने जमिनीवर आणा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या कंपनीच्या सुरक्षेबाबत आणि तांत्रिक देखभालीबाबत पवार कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जोपर्यंत या अपघाताचा सखोल तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत 'व्हीएसआर' एअरवेजची सर्व विमाने तातडीने जमिनीवर आणावीत आणि त्यांची उड्डाण थांबवावी, अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. इतर कोणत्याही प्रवाशाचा जीव धोक्यात येऊ नये, हा त्यामागील हेतू असल्याचे बोलले जाते.

advertisement

अपघात की घातपात

रोहित पवार यांनी यापूर्वीच हा अपघात घातपात असू शकतो, असे सूचक विधान केले होते. आता अजित  पवारांचे कुटुंबीय स्वतः मैदानात उतरल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जर खरोखरच यात घातपाताचा आढळून आला  तर भारतीय राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने शोकाकुल असून, सत्याचा उलगडा व्हावा हीच प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे.

advertisement

हे ही वाचा : 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संकट गंभीर, तर पुणेकर खंबीर! दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी मोठा निर्णय, Video
सर्व पहा

Ajit Pawar: अजित पवारांचे नाव बारामती मेडिकल कॉलेजला नको, नामकरणावरून नवा वाद; होळकर घराण्याचा तीव्र विरोध

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जय आणि पार्थला वाटतोय घात? वडिलांच्या मृत्यूची चौकशी, थेट पंतप्रधान मोदींची घेणार भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल