सरकारच्या विविध विभागांची परवानगी न घेताच अकोला जिल्ह्यात अवैध वीटभट्ट्या सुरू आहेत, असा आरोप बाळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सुरजूसे यांनी केलाय. याप्रकरणी संबंधितांवर कार्यवाहीमागणीही करण्यात आली. सुरजूसे हे 2012 पासून अवैध वीट भट्ट्या संदर्भात लढा देत आहेत.
अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी वीटभट्ट्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी प्रदुषणासह अन्य नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. याबाबत राज्य शासनाने सन २०१६ मध्ये अधिसूचनाही जारी केली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणमंडळाने मार्च २०२२ मध्ये आदेश जारी करून सूचनाही केल्या होत्या. त्यानंतर सर्व तहसीलदारांकडे वीटभट्टी मालकांनी अर्ज केले होते. दरम्यान बाळापूर भ्रष्टाचार विरोधीजन आंदोलन न्यासचे तालुकाध्य क्षगणेश सुरजुसे यांनी धरणे आंदोलन केले.
advertisement
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला मुख्यमंत्री, प्रदुषण नियत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले. यानिमित्ताने अनधिकृत वीटभट्टींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर तालुक्यात सर्वाधिक वीटभट्ट्या आहेत. ही संख्या १२०० पेक्षा जास्त असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बाळापूर, चोहोट्टा बाजार परिसरातील वीट मराठवाडा, विदर्भात विकली जाते. वीट बनवण्यासाठी मोठ्याप्रमाणात पारस औष्णिक प्रकल्पातील राख सुद्धा वापरली जाते. मात्र अनेक वीट भट्ट्यानं परवानगी नसताना राख कशी पुरवली जाते असा सवालही उपस्थित केला जात आहे.
वीट भट्ट्यांचा हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यापूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला होता. त्यांनी किती वीट भट्ट्या आहेत, किती अवैध भट्ट्या आहेत, किती भट्ट्यांची तपासणी केली, दंड आदींची माहिती विचारली होती. त्यावेळी तपासणीचे आदेश दिले गेले।होते. मात्र अध्यपही तपासणी झाली नसल्याने, तपासणी न झाल्यास हा मुद्दा पुन्हा पावसाळी अधिवेशनात उचलणार असल्याचा इशारा आमदार मिटकरी यांनी दिलाय.
विना परवानगी अवैध वीट भट्ट्यामुळे पर्यवर्णावर याचा परिणाम होत असल्याने, शासनाने जातीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.