TRENDING:

मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरनेच विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवले, अकोल्यात खळबळ

Last Updated:

सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुंदन जाधव, अकोला : मानसिक आरोग्यावर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला येथे घडली आहे. डॉ. प्रशांत जावरकर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. प्रशांत जावरकर आत्महत्या
डॉ. प्रशांत जावरकर आत्महत्या
advertisement

सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. अकोल्यातील या घटनेने शहर आणि जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

डॉ. प्रशांत जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. ते अनेक रुग्णांवर उपचार करीत मानसिक आधार देत असत. मात्र, त्यांनीच आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

डॉ. प्रशांत जावरकर हे स्वतः समुपदेशन करायचे. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्या केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. प्रशांत जावरकर यांनी न्यु तापडिया नगर येथील स्वतःच्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक वर्षांपासून डॉ. प्रशांत जावरकर हे डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये मानसिक तणावाने ग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करत होते. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

advertisement

डॉ. जावरकर यांच्याकडून नियमित उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येही मोठी शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरनेच विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवले, अकोल्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल