भाजप खासदार सध्या व्हेंटीलेटरवर. हे लोक त्यांचं व्हेंटीलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही. दरम्यान आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन राज्यात एक नवा वाद पेटला आहे. अकोल्यात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांनी अकोलेकरांची माफी मागावी, असे शब्दात भाजपन घोषणा दिल्या आहेत. बापाच्या वयाच्या व्यक्तीवर अशा प्रकारचं विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रतिक्रिया देत भाजपनं आज अकोल्यातल्या दुर्गा चौकात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. भाजपच्या युवा आघाडीचे पदाधिकारी पवन महल्ले यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
advertisement
वाचा - 'सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करू नये अन्यथा..' ठाकरे गटाचा काँग्रेसला गंभीर इशारा
अकोल्यात खासदारबाबत नाना पटोलेंचं काय होतं व्यक्तव्य?
अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटीलेटरवर आहे, हे लोक त्यांचं व्हेंटीलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही. कदाचित निवडणुकीतच काढतील. नाना पटोले यांनी अकोल्यात हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांच्या नामांकन जाहीर सभेत पटोले यांनी हे वक्तव्य केलंय.
काँग्रेसचा उमेदवार कोण?
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांनी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उपस्थिती दर्शवून सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले, २०१४ आणि २०१९ या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन कसं करता येईल हे भाजपचं षडयंत्र होतं. असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी आंबेडकरांना लगावला.
