याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू आहे. २१ फेब्रुवारीला इंग्रजीचा पेपर होता. या पेपरला पोलिसांच्या गणवेशात एक जण आला होता. कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं बिंग फुटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. अनुपमन मदन खंडारे असं त्याचं नाव आहे.
बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी अनुपम खंडारे पोलिसाच्या गणवेशात परीक्षा केंद्रावर आला होता. त्याच वेळी पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे ताफ्यासह परीक्षा सेंटरवर बंदोबस्ताला पोहोचले. तेव्हा अनुपम खंडारेहासुद्धा तिथेच होता.
advertisement
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच तोतया पोलीस बनलेल्या अनुपमने सॅल्यूट केला. सॅल्युट करताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अनुपमने घातलेला गणवेश, त्यावर असणारी नेमप्लेट चुकीची असल्याचं लक्षात आलं. जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे इंग्रजीच्या विषयाच्या कॉपी सापडल्या. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
