अमोल मिटकरी यांनी कर्णबाळा दुनबळे याच्यावर हल्लाबोल करताना त्याच्या अटकेचीही मागणी केलीय. कर्णबाळा हा पोलिसांचा जावई आहे का, त्याला आधी अटक करा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तर जामीन मिळालेल्या मनसे कार्यकर्त्यांना हा न्यायालयाचा भाग आहे. असेही मिटकरी म्हणाले, पण कर्णबाळा याला अमोल मिटकरी कोण आहे दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
advertisement
अमोल मिटकरी यांच्या गाडीचा काच फोडणारा मुख्य आरोपी सचिन गालट या मनसैनिकासह 2 जणांना अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीसांनी हॉटेल आर जी येथून अटक केली आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर मनसैनिक संतप्त झाले होते. संतप्त मनसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात अमोल मिटकरी थांबले असताना राडा घातला. दरम्यान सचिन गालट या मनसैनिकाने मिटकरीच्या गाडीचा काच झाडाची कुंडी फेकून फोडला होता. आज सचिन गालट आणि इतर लोकांना अटक केली आहे. काल जिल्हा प्रमुख पंकज साबळे शहर प्रमुख सौरभ भगत सह एकाला जामीन मिळाला होता