TRENDING:

BJP : 'राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं', भाजप आमदार भडकला; मिटकरी-चव्हाणांची 'लायकी' काढली!

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आमचं वाटोळं झालं, अशी कबुली दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी
'राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं', भाजप आमदार भडकला; मिटकरी-चव्हाणांची 'लायकी' काढली!
'राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं', भाजप आमदार भडकला; मिटकरी-चव्हाणांची 'लायकी' काढली!
advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आमचं वाटोळं झालं, अशी कबुली दिली आहे. तसंच अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांची भाजप-आरएसएसवर बोलण्याची लायकी नाही, अशी टीकाही सुरेश धस यांनी केली आहे.

advertisement

'आमच्या युतीत तिसरा भिडू आला, हे जनतेला पटलं नाही. लोक आमच्या विरोधात का गेले? लोकांच्या मनात राग का निर्माण झाला? याचं कारणच हे आहे. राष्ट्रवादीला तुम्ही का घेतलं? त्यामुळे आमचं वाटोळं झालेलं आहे. आम्ही आतापर्यंत शांत होतो, आम्ही हसत हसत उत्तर दिलं होतं. सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी भाजप आणि आरएसएसवर बोलत असतील तर शांत राहणं बरोबर नाही. आरएसएस आणि भाजपवर बोलण्याइतकी त्यांची लायकी नाही', असं सुरेश धस म्हणाले.

advertisement

'राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बोलण्यापुरती नोटीस वगैरे देत आहेत. नाटक करतायत आणि हळूच त्यांना बोलायला पाठवत आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर तुमचे तुम्ही सेपरेट व्हा, आमचं आम्ही सेपरेट लढू. शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील', असा इशाराही सुरेश धस यांनी दिला आहे.

'बहुतांश ठिकाणी तुतारीचे एजंट घड्याळाचे लोक होते, तेच तुतारीचे एजंट झालेले आहेत, यावर खुलेआम चर्चा व्हावी. एवढं सगळं होऊनही आम्हीच शांत राहतोय. तुम्ही रोज उठून भाजप, आरएसएसवर बोलायला हे लोक विद्वान आहेत, असं मला वाटत नाही', असंही सुरेश धस म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : 'राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं', भाजप आमदार भडकला; मिटकरी-चव्हाणांची 'लायकी' काढली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल