TRENDING:

अमित शाह नांदेड दौऱ्यावर, भाजपचं जंगी नियोजन, अशोकरावांच्या होमग्राऊंडवर शंखनाद होणार

Last Updated:

Amit Shah Nanded Daura: देशाचे गृहमंत्री अमित शाह सोमवारी नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पुढच्या दोन ते तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्ष यात आघाडीवर आहे. सोमवारी नांदेडमध्ये अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडमध्ये सभा होणार आहे.
अमित शाह-अशोक चव्हाण
अमित शाह-अशोक चव्हाण
advertisement

नांदेडच्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. याच सभेतून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंख फुंकेल.

अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शहा हे २५,२६ आणि २७ मे असे तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रात्री आठ वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत केले.

advertisement

अमित शाह यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. शिवाय राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपछडे आणि महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाट्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे. या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवीन मोंढा मैदानावर भाजपची जाहीर सभा पार पडणार आहे.

advertisement

कार्यक्रमाला शंखनाद असे नाव

नांदेडमध्ये होणार्‍या कार्यक्रमाला भाजपने शंखनाद असे नाव दिले आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश, सैन्याचा गौरव, विकसित भारताचा शंखनाद असा कार्यक्रमामागील टॅगलाईनचा अर्थ असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. याच सभेतून भारतीय जनता पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंखनाद करेल.

महापालिकेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही , मला हक्क भंग कारवाई करण्याचा अधिकार- काँगेस खासदार रवींद्र चव्हाण

advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र नांदेड महापालिकेच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांना नाहीये. महापालिकेचा हा कार्यक्रम असल्याने प्रोटोकॉलनुसार लोकप्रतिनिधीला आमंत्रण देणे बंधनकारक असते. असे असताना या कार्यक्रमाचे निमंत्रण हे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांना आलेले नसल्याने हक्कभंग कारवाई करण्याचा इशारा खासदार चव्हाण यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमित शाह नांदेड दौऱ्यावर, भाजपचं जंगी नियोजन, अशोकरावांच्या होमग्राऊंडवर शंखनाद होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल