अमरावती - विदर्भात अनेक पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी एक आगळावेगळा उत्सव म्हणजे भुलाबाई उत्सव आहे. दसऱ्याच्या दिवशी लहान मुली भुलाबाईची स्थापना करतात. दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत त्यांची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात त्यांची सांगता केली जाते. हा उत्सव का साजरा केला जातो, यामागची नेमकी काय परंपरा आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, भुलाबाई हा उत्सव शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. दसऱ्याच्या काळात अनेक शेतकऱ्यांचे पिके शेतातून घरी आणतात. त्याचे स्वागत म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
दसऱ्याच्या दिवशी भुलाबाई स्थापन करून विवध गाणे म्हटले जातात. 'कारल्याची बी लावं ग सूनबाई, मग जाय आपल्या माहेरा' तसेच 'उलीसा पापड भाजीला' यासारखी अनेक गाणी प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हटले जातात. त्याचबरोबर खिरापत सुद्धा केली जाते. खिरापतीमध्ये नवीन आलेल्या धान्यापासून काही पदार्थ बनवतात. नंतर ते गाणे झाल्यावर ताब्यात भरून हलवतात आणि ओळखायला सांगतात.
पुण्यात ओडिशा सरकारच्या वतीने चालवतं जातं उत्कलिका हँडलूम, काय आहे याठिकाणी विशेष?
संस्कृती आणि मनोरंजन दोन्हीची सांगड घालणारा हा सण आहे. हा सण लहान मुलांकडून जास्त साजरा करण्यात येतो. कोजागिरी पौर्णिमेला ज्वारीचे धांडे आणून त्या खाली भुलाबाई बसवल्या जातात. मातीचे पाच दिवे बनवले जाते. त्याची पूजा करण्यात येते. विविध प्रकारचा खाऊ बनवला जातो. भुलाबाई ही माहेरवासिण असल्याने तिला शिदोरी सुद्धा दिली जाते. बासुंदीचा नैवद्य दाखवला जातो.
या सणाला सर्वात जास्त आनंद म्हणजे विदर्भातील बोलीमध्ये म्हटलेल्या गाण्यांचा घेता येतो. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या वेशभूषा करून मस्करी सुद्धा केली जाते, अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
सूचना - ही माहिती ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.