सणासुदीच्या काळात ॲसिडिटी होऊ नये, म्हणून काय करावं? आणि त्याबाबत आणखी माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे. डॉ. धीरज आंडे सांगतात की, जास्त प्रमाणात तेलकट, तिखट, मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने पोटातील आम्ल वाढते. हे आम्ल जठरातून अन्ननलिकेत परत येते आणि यामुळे ॲसिडिटी होते. त्यासोबतच जास्त खाणे, अनियमित जेवण वेळा आणि अपुरी झोप देखील ॲसिडिटी वाढवते.
advertisement
ॲसिडिटी वाढल्यास कोणते लक्षणे आढळून येतात?
ॲसिडिटी झाल्यास छाती व पोटाच्या वरच्या भागात तीव्र जळजळ होणे. करपट ढेकर येणे, पोट जड होणे आणि फुगणे, मळमळ, तोंडात चव न लागणे आणि काहीवेळा बद्धकोष्ठता किंवा उलट्या देखील होऊ शकतात.
फराळ खाताना काय काळजी घ्यावी?
खाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा, थोडे आणि हळू खा. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. नुसते पाणीच नव्हे, तर लिंबू पाणी, ताक यासारखी पेये पचन सुधारण्यास मदत करते. त्याने त्याचाही आहारात समावेश करा. प्रत्येक घास चावल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोटावर ताण पडत नाही. विशेषतः पाम तेलात तळलेले पदार्थ टाळावेत. नेहमी ॲसिडिटीचे औषध घेण्याऐवजी आपण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
जेवणानंतर ओवा पाण्यात उकळून प्यायले, गॅस आणि ॲसिडिटी कमी होते. गरम पाण्यात लिंबू मिसळून पिणे देखील पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. दिवाळीत फराळाचा आनंद सुद्धा घ्या, पण संतुलन राखणेही तितकेच आवश्यक आहे. तेलकट आणि गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा, जेवण व झोप यामध्ये किमान दोन तासांचा अंतर ठेवा, पाणी नियमित प्या. ॲसिडिटी कमी होत नसेल किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली.